बुधवार, ३ जून, २०१५

गुगलची नवी आॅपरेटिंग सिस्टीम ब्रिलो



अनिल भापकर
तुमच्या हातातल्या मोबाइलने तुम्ही घरातले दिवे, पंखा चालू-बंद करू शकाल,
कॉफी करू शकाल,आणि वॉशिंग मशीनमधे कपडे धुण्यापासून सीसीटीव्ही कॅमेरे चालूबंद करण्यार्पयत
वाट्टेल ते काम करणारी एक जादू .
इंटरनेट ऑफ थिंग्ज
 पूर्वी तंत्रज्ञान म्हटलं की मोठमोठय़ा कंपन्यांनी माणसाचं काम सोपं करण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी हजार माणसं काम करायची त्या ठिकाणी वापरायची एखादी अत्याधुनिक मशीनरी असा एक समज होता. जो काही अंशी खराही होता. हजारो माणसांचं काम ही मशीन्स एकटय़ानं करायची; शिवाय कामाचा दर्जाही अत्युच्च असायचा. म्हणजे पूर्वीचे तंत्रज्ञान हे कंपन्या, कारखान्यापुरते मर्यादित होते. आता मात्र आयटी अर्थात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरात या तंत्रज्ञानानं प्रवेश केला आहे. म्हणजेच तंत्रज्ञान हे आपल्या जगण्याचा भाग बनतंय.  मात्र ते तंत्रज्ञान उत्तम रितीनं वागून आपलं जीवन आणखी सुखकर कसं करायचं हे जर आपल्याला कळलं नाही तर जग आपल्या खूप पुढे निघून जाईल आणि आपण मात्र कदाचित मागेच राहून जाऊ. 
त्याच तंत्रज्ञानाचं एक आपल्या हातातलं रूप म्हणजे गॅजेट. सध्याचा जमाना हा या गॅजेट्सचा आहे. बाजारात एवढी वेगवेगळी गॅजेट्स उपलब्ध आहेत की त्याची योग्य निवड करताना नाकीनव येते. जणू आपल्या जगण्यावर वेगवेगळ्या गॅजेट्सची सत्ता आहे. इंटरटेनमेंटशी संबंधित गॅजेट्सचा तर बाजारात एवढा सुळसुळाट झाला आहे की, कुठले गॅजेट्स घ्यावे आणि कुठले घेऊ नये हे कळतच नाही. त्यात आता नव्याने भर पडली आहे ती स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, नेटबुक, डिजिटल कॅमेरे, आयपॉड या सा:यांची!
तंत्रज्ञानामधे सातत्याने नवीन काहीतरी देण्यासाठी सदैव आघाडीवर असलेल्या गुगलने याही वेळी एक धमाका केला आहे. गुगलने एक नवीन ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात आणण्याची घोषणा  केली आहे. या ऑपरेटिंग सिस्टमचे नाव आहे ब्रिलो.  
कुठलंही डिव्हाइस स्मार्टफोनशी कनेक्ट करण्यासाठी या ब्रिलो ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग होणार आहे. सध्या होम अप्लायन्समधील येऊ घातलेल्या क्रांतीमधे म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स या तंत्रज्ञानामधे प्रामुख्याने ब्रिलो या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर होणार आहे. पूर्वी घरातील वेगवेगळी करमणुकीची उपकरणो एकत्रित करून म्हणजे त्याचे होम नेटवर्क करणो खूप अवघड होते. त्यासाठी या उपकरणांना आयपी अॅड्रेस देऊन लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या साहाय्याने त्याचे होम नेटवर्क करून कंटेंट शेअरिंग केले जात असे. ही तशी खूप क्लिष्ट पद्धत होती. 
येणारा काळ हा होम अप्लायन्समधे क्रांती घडवणारा काळ असेल. त्याला कारणही तसेच आहे. येणा:या काळात तुमच्या घरातील वॉशिंग मशीन, टीव्ही, रेफ्रिजरेटर, कॉफी मेकर मशीन, तुमच्या घराचा दरवाजा तसेच घरातील सीसीटीव्ही कॅमेरे अगदी सर्वकाही इंटरनेटवर काम करणार आहे. म्हणजेच हे सर्व होम अप्लायन्स इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला वापरता येतील आणि तुमच्या स्मार्टफोनवरून कंट्रोलही करता येतील. जसे दाराला कुलूप घालणो-उघडणो, तुमच्या घरातील कॉफी मेकरला तुमच्यासाठी कॉफी करायला सांगणो (ऑनलाइन तुमच्या स्मार्टफोनवरून), तुमच्या घरातील लाईट बंद करणो, चालू करणो आदि. म्हणजेच तुमच्या घरातील सर्व डिव्हाइसला तुम्ही तुमच्या बोटावर नाचवूशकता. तुमची प्रत्येक आज्ञा हे होम अप्लायन्स न कुरकुरता पाळत जाईल. याच तंत्रज्ञानाला इंटरनेट ऑफ थिंग्स असे म्हणतात. याच इंटरनेट ऑफ थिंग्ससाठी गुगलच्या ब्रिलो या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर होणार आहे.
गुगलची ही ब्रिलो ऑपरेटिंग सिस्टम अॅण्ड्रॉईड प्लॅटफॉर्मवरच आधारित असणार आहे. त्याचबरोबर ब्रिलो ही ऑपरेटिंग सिस्टम अत्यंत कमी रिसोर्सवर काम करेल जसे क ी कमी रॅम, कमी स्पीडचा प्रोसेसर आदि. म्हणजेच तुमच्या घरातील सर्व होम अप्लायन्ससाठी गुगलच्या ब्रिलो या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर होऊ शकतो. घरातील सर्व डिव्हाइसेस एकमेकांशी जोडण्यासाठी तसेच हे सर्व डिव्हाइसेस तुमच्या स्मार्टफोनला जोडण्यासाठी ब्रिलो या ऑपरेटिंग सिस्टमचा उपयोग होणार आहे.
anil.bhapkar@lokmat.com

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा