रविवार, २८ मे, २०१७

सावधान : आता 'व्हॉट्सअ‍ॅप'च्या माध्यमातून व्हायरस
  • अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 17 - वन्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असतानाच आता जगभरात 56 कोटी युझर्स वैयक्तिक इमेल आणि पासवर्ड लीक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. म्हणजेच हॅकर आता वेगवेगळ्या माध्यमातून तसेच व्हायरसचे हल्ले करीत आहे.आता तर या हॅकर्स ने व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून व्हायरस पसरविण्यास सुरुवात केली आहे. सध्या एक लिंक व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल होत आहे ते म्हणजे या लिंक वर क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅपचा कलर बदलता येतो.

    या संबंधीची अधिक माहिती अशी की मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून एक मेसेज सगळीकडे फिरत आहे तो मेसेज म्हणजे जर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अधिक कलर फुल्ल करायचे असेल अर्थात तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अप्लिकेशन चा कलर चेंज करायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा असा मेसेज असतो. जर ह्या लिंक वर क्लिक केले तर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या ऑफिसिअल साईटवर घेऊन जाण्याऐवजी दुसऱ्याच डोमेन वर ही लिंक घेऊन जाते. नंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी ही लिंक तुमचे व्हॉट्सअ‍ॅप फ्रेंड आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये शेअर करण्यास सांगितले जाते.ही फेक व्हॉट्सअ‍ॅप लिंक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मॅलवेअर चा प्रकार असून जो तुमचा डेटा चोरण्याचे काम करतो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या फेक लिंक वर क्लिक करता तेव्हा एक छोटासा प्रोग्राम तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टॉल होतो जो डेटा चोरून तो डेटा हॅकर कडे पाठविण्याचे काम करतो त्यालाच मॅलवेअर असे म्हणतात.
    काय काळजी घ्यावी ?
    १. सगळ्यात महतवाचे म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप कधीच अशा प्रकारचे मेसेज आपल्या युझर्सला पाठवत नाही कारण व्हॉट्सअ‍ॅपचे अपडेट हे गुगल प्ले किंवा अँपल स्टोअर मार्फत मिळतात.
    २. कुठल्याही अनोळखी लिंक ला क्लिक करू नका जे सांगतात कि या मध्ये व्हॉट्सअ‍ॅप अपडेट उपलब्ध आहेत.
    ३. अनोळखी मित्राने जर काही व्हिडिओ किंवा लिंक पाठविले असल्यास ओपन करू नका . अथवा शक्य असल्यास कॉल करून लिंक कसली आहे याविषयी खातरजमा करा.
    ४.तुमच्या कडे जर चुकून अशी लिंक आलीच तर तुम्ही ती पुढे फॉरवर्ड करू नका.
    ५. तुमच्या स्मार्टफोन मध्ये एखादा चांगला अँटीव्हायरस असावा .
    anil.bhapkar@lokmat.com

गुगल लेन्स : स्मार्ट इमेज सर्च

  • अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 18 - गुगल ला टेक्नोसॅव्ही जगता मध्ये कल्पवृक्ष असे देखील संबोधले जाते . अशी आख्यायिका आहे कि कल्पवृक्षा खाली बसून कुठलीही इच्छा व्यक्त केली ती क्षणात पूर्ण होते. अगदी तसेच या टेक्नोसॅव्ही जगता मध्ये गुगलकडे तुम्ही कुठलीही माहिती मागितली की ती क्षणात पूर्ण होते . गुगल हीच त्यांची ख्याती टिकवून ठेवण्यासाठी रात्रंदिवस मेहेनत करीत आहे. नुकतच गुगलच्या आय /ओ डेव्हलपर कॉन्फेरंस मध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी एका नवीन टेक्नोलॉजीची घोषणा केली ज्याचे नाव आहे गुगल लेन्स . 

    इंटरनेट सर्चची परिभाषाच बदलून टाकणाऱ्या या तंत्रज्ञानाची नुकतीच गुगलने डेव्हलपर कॉन्फेरंसमध्ये घोषणा केली . आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान वापरून गुगल तुमच्या स्मार्टफोन चा कॅमेरा गुगल लेन्स ऍप च्या मदतीने अधिक स्मार्ट बनविणार आहे.
    गुगल लेन्स ऍप च्या मदतीने जेव्हा तुम्ही तुमचा स्मार्टफोन चा कॅमेरा एखाद्या फुलावर रोखाल तेव्हा गुगल लेन्स ऍप तुम्हाला लगेच सांगेल की हे फुल कुठले आहे तसेच त्याबद्दलची सगळी माहिती तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनवर दिसेल.
    दुसरे उदाहरण सुंदर पिचई यांनी दिले की समजा तुम्ही एखाद्या दुकानासमोरून जात आहात आणि तुम्ही त्या दुकानाच्या बोर्ड वर स्मार्टफोन कॅमेरा धरला तर गुगल लेन्स ऍप लगेच त्या दुकानासंबंधी सर्व माहिती तुमच्या स्मार्टफोन स्क्रीन वर दाखवेल.
    तिसरे उदाहरण सुंदर पिचई यांनी दिले की तुमच्या घरात जो वाय-फाय राउटर आहे त्याच्या स्टिकर वर जर तुम्ही स्मार्टफोन कॅमेरा धरला तर गुगल लेन्स लगेच तुमच्या वाय-फाय चा पासवर्ड टाकून कनेक्ट होईल .
    एकूणच काय तर तुम्ही ज्या ज्या ठिकाणावर किंवा वस्तूवर किंवा आणखी कुठेही स्मार्टफोन कॅमेरा धराल त्या विषयी माहिती क्षणात तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनवर दिसेल .आहे की नाही जादु.
    anil.bhapkar@lokmat.com

 

व्हॉट्सअॅपचे नवीन 'पिन चॅट' फिचर

अनिल भापकर
ऑनलाइन लोकमत
-  दिवसेंदिवस सोशल मीडिया  कंपन्या आपापल्या युझर्सला आकर्षक सेवा देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे. काहीही करुन आपले युझर आपल्याला सोडून दुसऱ्या सोशल मीडियावर शिफ्ट नाही झाला पाहिजे यावर या कंपन्यांचा कटाक्ष असतो. व्हॉट्सअॅप सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजरअॅप आहे. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन फिचर्स देण्यासाठी व्हॉट्सअॅप नेहमी पुढे असतो. याच कारणामुळे दररोज व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्या युझर्सची संख्या वाढतच आहे. 
आता व्हॉट्सअॅपने त्यांच्या युझर्सला अजून एक नवीन फिचरची भेट दिली आहे. या नवीन फिचर चे नाव आहे पिन चॅट. काही दिवसापूर्वी व्हॉट्सअॅप ने त्यांच्या बीटा युझर्स साठी पिन चॅट टेस्टिंगला दिले होते. आता मात्र व्हॉट्सअॅप ने पिन चॅट या फीचरची अधिकृत घोषणा करून लेटेस्ट अपडेट मध्ये हे पिन चॅट फीचर अँड्रॉइड युझर्ससाठी उपलब्ध करून दिले आहे. तुम्ही ते अपडेट डाउनलोड करू शकता. 
 
 
काय आहे पिन चॅट ?
आपल्याकडे व्हॉट्सअॅपचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे कि आपली इच्छा नसतानाही दिवसभरात आपल्याला जवळपास शंभरहून अधिक चॅट मेसेज येतात तर दररोज अनेक ग्रुपमध्ये आपल्याला न विचारता अॅड केले जाते . त्यामुळे होते काय कि आपल्यासाठी जे व्हॉट्सअॅप मेसेज किंवा ग्रुप महत्वाचे आहेत नेमके तेच ग्रुप चॅट किंवा मेसेज खूप खाली जातात आणि या चॅटच्या गर्दीमुळे एखादा महत्त्वाचा मेसेज पाहिला जात नाही. उदाहरणार्थ समजा तुमचा ऑफिसचा एखादा महत्त्वाचा ग्रुप आहे जो ऑफिशिअल कम्युनिकेशनसाठी वापरला जातो आणि एखाद्या दिवशी खूप महत्त्वाचा व्हॉट्सअॅप मेसेज ऑफिस मधून येतो आणि या व्हॉट्सअॅप मेसेजच्या गर्दी मुळे नेमका तोच मेसेज पाहिला जात नाही आणि तुम्हाला वरिष्टांचे एकूण घ्यावे लागते. 
 
किंवा दुसरे उदाहरण म्हणजे जर तुमचा नातेवाईकांचा एखादा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे आणि एखाद्या  महत्वाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण पाहायचे राहून जाते आणि तुम्हाला नातेवाईकांचे बोलणे ऐकून घ्यावे लागते. आता व्हॉट्सअॅप ने यावर जालीम उपाय शोधला आहे. आता व्हॉट्सअॅपने पिन चॅट हे एक नवीन फिचर अँड्रॉइड धारकांसाठी आणले आहे. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तीन ग्रुप किंवा व्हॉट्सअॅप युझर्सला पिन करू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रुप किंवा युझर्सला पिन करता तेव्हा हे ग्रुप किंवा युझर्स लिस्टमध्ये सर्वात वर येतात म्हणजेच या पिन केलेल्या ग्रुप किंवा युझर्सचे मेसेज आधी पाहिल्या जातील. म्हणजेच महत्त्वाचे मेसेज पाहिले नाही असे होणार नाही. या फिचरला पिन चॅट असे म्हणतात. 
 
कसा वापर करणार ?
पिन चॅट या फिचर चा वापर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करून घ्यावे लागेल. व्हॉट्सअॅप अपडेट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप ओपन कराल तेव्हा ज्या महत्त्वाच्या ग्रुप किंवा व्हॉट्सअॅप युझर्सला तुम्हाला पिन करायचे आहे त्यावर टॅप करा. त्यानंतर वरील बाजूस पिनचा सिम्बॉल दिसेल त्यावर क्लिक केले कि झाला तो ग्रुप किंवा युझर्स पिन. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादा ग्रुप किंवा युझर्स अनपिन करायचा असेल तर परत त्यावर टॅप करा आणि वरच्या अनपिन सिम्बॉलला क्लिक केलं कि झालं. आहे ना एकदम कामाचे 'पिन चॅट' फिचर. 
anil.bhapkar@lokmat.com

 

 

जगभरात 'रॅन्समवेअर' व्हायरसचा धुमाकूळ

अनिल भापकर/ ऑनलाइन लोकमत
शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला कारण आता पर्यंतचा सर्वात मोठा 'रॅन्समवेअर' व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला. भारतासहित जवळपास १०० देशात 'वन्नाक्राय ' या 'रॅन्समवेअर' व्हायरस ने अक्षरशः धुमाकूळ घातला . सायबर सिक्युरिटी फर्म अव्हास्ट ने सांगितले कि जगभरात जवळपास पंचाहत्तर हजार संगणकावर हा हल्ला झाला. शंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले . या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लड ला बसला . इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली . अनेक हॉस्पिटल्स मध्ये तर रुग्णांचे ऑपेरेशन आणि अपाईनमेंट देखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नससल्यामुळे डॉक्टरांवर कागद पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली.


 


'रॅन्समवेअर' म्हणजे नेमकं काय ?
एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो कि तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रिन वर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शन ला क्लिक करून अमुक इतकी रक्कम ह्या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासात जर ही रक्कम जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंट डाऊन सुद्धा चालू झालेले असते. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा ह्या हॅकर्स ने घेतलेला असतो. ह्या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही अर्थात तुमची ऑपरेटींग सिस्टम चालूच होत नाही. ह्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. ह्या मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणी तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत .जगाच्या कुठल्या तरी कानाकोपर्‍यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.
 
काय काळजी घ्यावी ?
१. सगळ्यात आधी तर तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अ‍ॅण्टीव्हायरस असणे तसेच
अ‍ॅण्टीव्हायरस नियमित अपडेट असणे आवश्यक आहे.
२.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडुन चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका .
३. संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटींग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेट मध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स वर सोलुशन उपलब्ध असते . जसे कि 'रॅन्समवेअर' साठी पॅच मायक्रोसॉफ्ट ने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .
४. तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमित डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटा च्या बदल्यात हॅकर ने तुम्हाला पैसे मागीतले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही .
 
स्मार्टफोन ला ही धोका
संगणकांप्रमाणे स्मार्टफोन ला ही हॅकिंग चा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोन वर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती ह्या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठी सुद्धा टाकल्या असू शकतात .त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एखादे एप तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या . शक्यतो गुगल प्ले वरून एप इन्स्टाल करा . कुठलीही ए पी के फ़ाइल घेऊन तुमच्या स्मार्टफोन वर इंस्टाल करू नका . 
 
एक वर्षांपूर्वी लोकमत ने दिला होता इशारा
सोमवार ६ जून २०१६ च्या अंकात लोकमतने ने 'रॅन्समवेअर' ह्या व्हायरस च्या संभाव्य धोक्याविषयी आपल्या वाचकांना इशारा दिला होता . तसेच 'रॅन्समवेअर' ह्या व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली होती . 'रॅन्समवेअर' च्या संभाव्य हल्ल्याचे भाकीत देखील लोकमतने केले होते . 
anil.bhapkar@lokmat.com