रविवार, २८ मे, २०१७

गुगल लेन्स : स्मार्ट इमेज सर्च

  • अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 18 - गुगल ला टेक्नोसॅव्ही जगता मध्ये कल्पवृक्ष असे देखील संबोधले जाते . अशी आख्यायिका आहे कि कल्पवृक्षा खाली बसून कुठलीही इच्छा व्यक्त केली ती क्षणात पूर्ण होते. अगदी तसेच या टेक्नोसॅव्ही जगता मध्ये गुगलकडे तुम्ही कुठलीही माहिती मागितली की ती क्षणात पूर्ण होते . गुगल हीच त्यांची ख्याती टिकवून ठेवण्यासाठी रात्रंदिवस मेहेनत करीत आहे. नुकतच गुगलच्या आय /ओ डेव्हलपर कॉन्फेरंस मध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी एका नवीन टेक्नोलॉजीची घोषणा केली ज्याचे नाव आहे गुगल लेन्स . 

    इंटरनेट सर्चची परिभाषाच बदलून टाकणाऱ्या या तंत्रज्ञानाची नुकतीच गुगलने डेव्हलपर कॉन्फेरंसमध्ये घोषणा केली . आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान वापरून गुगल तुमच्या स्मार्टफोन चा कॅमेरा गुगल लेन्स ऍप च्या मदतीने अधिक स्मार्ट बनविणार आहे.
    गुगल लेन्स ऍप च्या मदतीने जेव्हा तुम्ही तुमचा स्मार्टफोन चा कॅमेरा एखाद्या फुलावर रोखाल तेव्हा गुगल लेन्स ऍप तुम्हाला लगेच सांगेल की हे फुल कुठले आहे तसेच त्याबद्दलची सगळी माहिती तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनवर दिसेल.
    दुसरे उदाहरण सुंदर पिचई यांनी दिले की समजा तुम्ही एखाद्या दुकानासमोरून जात आहात आणि तुम्ही त्या दुकानाच्या बोर्ड वर स्मार्टफोन कॅमेरा धरला तर गुगल लेन्स ऍप लगेच त्या दुकानासंबंधी सर्व माहिती तुमच्या स्मार्टफोन स्क्रीन वर दाखवेल.
    तिसरे उदाहरण सुंदर पिचई यांनी दिले की तुमच्या घरात जो वाय-फाय राउटर आहे त्याच्या स्टिकर वर जर तुम्ही स्मार्टफोन कॅमेरा धरला तर गुगल लेन्स लगेच तुमच्या वाय-फाय चा पासवर्ड टाकून कनेक्ट होईल .
    एकूणच काय तर तुम्ही ज्या ज्या ठिकाणावर किंवा वस्तूवर किंवा आणखी कुठेही स्मार्टफोन कॅमेरा धराल त्या विषयी माहिती क्षणात तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनवर दिसेल .आहे की नाही जादु.
    anil.bhapkar@lokmat.com

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा