शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

प्रिझमा


अनिल भापकर
स्मार्टफोनवरच एडिटिंगची हौस भागवत, आपल्या फोटोंचा नूरच पालटणारं एक अँप
पूर्वी फोटोग्राफी करायची म्हटलं की एक चांगला कॅमेरा लागायचा.शिवाय फक्त कॅमेराच चांगला असून चालायचं नाही, तर त्यासाठी फोटोग्राफीचं चांगलं ज्ञान आणि तशी नजरसुद्धा लागायची; कारण तेव्हा रोलचा जमाना होता. आजच्या सारखी डिजिटल चंगळ नव्हती. एक चांगला फोटो मिळवण्यासाठी फोटोग्राफरला कित्येक तास नव्हे तर कधी कधी संपूर्ण दिवस मेहनत घ्यावी लागायची. फोटोग्राफी ही कठोर मेहनत घ्यायला भाग पाडणारी कलाच होती.
आजही ती कलाच आहे, मात्र तंत्रज्ञान आल्यानं हौशींनाही फोटो काढणं सोपं जाऊ लागलं. काळ बदलला आणि कॅमेरा रोलची जागा डिजिटल कॅमेरानं घेतली. फोटोग्राफी सोपी झाली आणि सामान्य माणसाच्या आवाक्यातही आली. 
कॅमेरा हातातल्या स्मार्टफोनमध्ये आला आणि प्रत्येकजण आपली फोटोग्राफीची हौस भागवू लागला. मात्न आता हे हौशी फोटोग्राफर फक्त क्लिक केलं आणि फोटो काढला म्हणजे झालं इथंच आता काम संपत नाही.
फोटो एडिटिंग अँप्स सध्या जास्त चर्चेत आहेत. फोनवरच फोटो एडिटिंग सध्या केलं जातं. आणि आपल्याकडे किती एकसे एक अँप्स आहेत यावरून तरुण जगात बढाई मारणंही सुरू झालेलं आहे. अशाच एका अँप्सचा सध्या सगळीकडे बोलबाला आहे त्याचे नाव आहे प्रिझमा.  
अगोदर हे अँप फक्त आयफोनसाठी उपलब्ध होतं. मात्न, याची लोकप्रियता बघून हे अँप जुलैपासून अँण्ड्रॉईडसाठी उपलब्ध झालं आहे. प्रिझमा हे अँप उपलब्ध झालं तेव्हापासून अनेकांच्या प्रोफाईल फोटोची जागा प्रिझमा फोटोनं घेतली. प्रिझमाने बॉलिवूड कलाकारांनादेखील वेड लावलं. 
 
काय आहे या प्रिझमात? 
१.  प्रिझमा अँप डाउनलोड करून स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करून घ्या. केवळ सहा एमबी साईज असलेले हे अँप लगेच इन्स्टॉल होतं. 
२.  प्रिझमा अँप रेडी टू यूज आहे, म्हणजे हे अँप अकाउंट क्रि एट करायला किंवा लॉगिन करायला सांगत नाही. 
३. तुम्ही प्रिझमा अँपचा वापर करून फोटो घेतला की लगेच अनेक आर्टवर्कचे ऑप्शन्स तुमच्या समोर येतात. त्यापैकी एक छान आर्टवर्क सिलेक्ट करता येतं. 
४.तुमच्या स्मार्टफोनवर आधीच सेव्ह असलेल्या फोटोंनासुद्धा प्रिझमा अँपच्या मदतीने एखाद्या छान आर्टवर्कमध्ये कन्व्हर्ट करता येतात. 
५.तुम्हाला असं वाटलंच की एखाद्या प्रसिद्ध चित्नकारानं तुमचं चित्र काढावं. मात्न त्यासाठी पैसे नसतात. ही हौस पूर्ण होणं शक्य नाही. मात्न  प्रिझमा अँपमुळे आता हे शक्य होऊ शकतं. फोटोला चित्राचा फील देता येऊ शकतो.
६. एखाद्या मोठय़ा स्केच आर्टिस्टकडून स्केच काढावं तसा या अँपचा वापर करता येतो.  
७. फायनल झालेला फोटो तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा सोशल मीडियावर शेअरही करू शकता. 
८. हौस भागवत आपल्याच फोटोंना नवीन लूक द्यायचा असेल तर प्रिझमा ट्राय करून पहायला पैसे पडत नाहीत.
anil.bhapkar@lokmat.com

 

सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

शब्द सुचवणारे गुगलचे 'एलो' मेसेजिग' अॅप

                                                                                      अनिल भापकर 
 
सध्या मेसेजिंग अॅप ची प्रचंड क्रेझ आहे. जणू काही हे मेसेजिंग अॅप म्हणजे लोकांच्या प्राथमिक गरजांपैकीच एक गरज झाले आहेत. या मध्ये व्हॉट्सअॅप , फेसबुक मेसेंजर ,हाईक आदी मेसेंजर अॅप ची चलती आहे. त्यामध्ये व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात सगळ्यात जास्त होतो आहे. 
 
दिवसेंदिवस व्हॉट्सअॅप आणि तत्सम मेसेंजर अॅप वापरणारे वाढतच आहे. आता या स्पर्धेत सर्च इंजिनचा बादशहा गुगलने पुन्हा उडी घेतली आहॆ. गुगलने एलो नावाचे स्मार्ट मेसेजिग अॅप आणण्याची तयारी केली आहे. 
 
या अॅप मध्ये गुगलने आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्सचा वापर केल्याचा दावा केला आहे. समजा तुम्हाला एखाद्या मेसेजला रिप्लाय द्यायचा असल्यास हे अॅप तुम्हाला शब्द सुचवणार आहे. 
 
तुम्ही फ़क़्त योग्य शब्द सिलेक्ट केला कि झाला. त्यामुळे तुमचे टायपिंग चे श्रम वाचणार आहे. याशिवाय इतरही अनेक चांगले फिचर यामध्ये असणार आहे. सध्या या अॅपचे गुगल प्ले वर रेजिस्ट्रेशन सुरु आहे. गुगल एलो नावाने गुगल प्लेवर सर्च करून या अॅपचे रेजिस्ट्रेशन करता येते. 
anil.bhapkar@lokmat.com

 

स्मार्टफोन नव्हे तुमचा गुगल पासवर्ड

                                                                                      अनिल भापकर
सध्याच्या पिढीला प्रायव्हसीने एवढे पछाडले आहे कि अगदी नवरा-बायको सुद्धा एकमेकांचे पासवर्ड एकमेकांना शेअर करत नाही . प्रत्येकजण आपापल्या परीने आपले युजरनेम आणि पासवर्ड गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतो . बर युझर नेम पासवर्ड ही किती असावे याला ही काही मयार्दा असाव्या , काम्पुटर चा युझर नेम पासवर्ड , स्मार्टफोन चा युझर नेम पासवर्ड , इमेल चा युझर नेम पासवर्ड, बँकेचा युझर नेम पासवर्ड , क्रेडीट कार्ड चा युझर नेम पासवर्ड ,मात्र यात नेमका घोळ होतो आणि कोणता पासवर्ड कशाचा आहे हेच विसरते. म्हणजे पासवर्ड ही एक सुरक्षा नसून कटकट आहे असे वाटायला लागते.
आता या पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या कटकटीतून गुगलने तुमची सुटका केली आहे. मात्र त्यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा आयफोन ५ एस किंवा त्याहून लेटेस्ट आयफोन असावा .अँड्रॉइड स्मार्टफोन यूझर्सला जर ही सुविधा स्मार्टफोन वर सुरू करायची असल्यास डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वर गुगल चालू केल्यावर गुगल अ‍ॅप्स मध्ये जाऊन माय अकाउंट ला क्लिक करावे त्यानंतर साइन इन अँड सिक्युरिटी वर क्लिक करून पुढील प्रोसेस पूर्ण करावी . यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये सुद्धा काही बदल करावे लागतील . जसे की सेटिंग मध्ये जाऊन सिक्युरिटी मध्ये जावे लागेल .
या ठिकाणी जाऊन स्क्रीन लॉक हे आॅप्शन सिलेक्ट करावे लागेल . त्यामध्ये जर नन असेल तर त्या ऐवजी पिन किंवा पॅटर्न लॉक किंवा इतर स्क्रीन लॉक आॅप्शन पैकी (स्लाईड सोडून ) सिलेक्ट करावे लागेल . एकदा का ही प्रोसेस पूर्ण झाली की जेव्हा तुम्ही कुठल्याही डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वर गुगल (जीमेल किंवा इतर गुगल लॉगिन ) लॉगिन कराल तेव्हा युझर नेम दिल्या नंतर पासवर्ड म्हणून तुमचा स्मार्टफोन अनलॉक करावा लागेल . तुमचा स्मार्टफोन अनलॉक केला की तुम्ही गुगल (जीमेल आदी ) ला लॉगिन व्हाल . झाली की नाही पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या कटकटीतून सुटका .
anil.bhapkar@lokmat.com

 

गुगलचे इन ऍप्स सर्च

  • अनिल भापकर
    काही दिवसापूर्वी तुम्ही तुमच्या मित्रासोबत स्मार्टफोन वर चॅट करत असताना त्याने तुम्हाला  शहरात नुकतेच नविन उघडलेल्या रेस्टॉरंट विषयी सांगितले होते. आणि आज तुमचा त्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जायचा मुड आहे. मात्र आता तुम्हाला त्या रेस्टॉरंटचे नावच आठवत नाही. तुमचा मित्र फोन उचलत नाही शिवाय जुना चॅट मेसेज असल्यामुळे शोधायला वेळ लागेल अशा वेळी काय कराल ? गुगलने तुमच्या या समस्यांचे निराकरण नुकतेच एक नवीन फिचर लाँच करून केले आहे. त्या फिचर चे नाव आहे इन ऍप्स . याचा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर रेस्टॉरंट असा सर्च दिला कि तुमच्या स्मार्टफोन वर ज्या ज्या ठिकाणी रेस्टॉरंट हा शब्द आलेला आहे ते सर्व क्षणात तुमच्या समोर हजर होईल.
    आतापर्यंत गुगल सर्च म्हटले कि वेब सर्च असाच त्याचा अर्थ होत असे . मात्र आता गुगलने नुकतेच एक ऑफलाईन अँड्रॉइड स्मार्टफोन सर्च फिचर लाँच केले आहे. जो तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन ऑफलाईन सर्च करेल. याचा वापर  करून तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन वरील कन्टेन्ट शोधू शकता . शिवाय हा सर्च ऑफलाईन असल्यामुळे त्यासाठी इंटरनेट ची सुद्धा गरज नसेल.
    सध्या तरी इन ऍप्स फक्त जीमेल ,स्पोटिफाय ,युट्युब आदींसोबत सर्च करेल मात्र लवकरच एव्हरनोट ,फेसबुक मेसेंजर, ग्लाइड, लिंक्डइन, टू-डू-लिस्ट, आदी ऍप्स साठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असे गुगलने सांगितले आहे. शिवाय नवीन येणाऱ्या अँड्रॉइड ओएस सोबत होम स्क्रीन वरच इन ऍप्स चा शॉर्टकटही असेल.
    anil.bhapkar@lokmat.com

 

एक मोठा गैरसमज : फेसबुक तुमचे सर्व फोटो डिलीट करणार

  •                                                         अनिल भापकर
    सध्या फेसबुक युझर्सला एक फार मोठी चिंता सतावते आहे ती म्हणजे जर सात जुलै पूर्वी मोमेंटस हे अ‍ॅप जर डाउनलोड केले नाही तर फेसबुक सर्व फोटो डिलीट करणार. आपले फेसबुक वरील सर्व फोटो डिलीट होणार या भीतीने अनेक फेसबुक युझर्स ला ग्रासले आहे . अनेकांनी केवळ फोटो डिलीट होतील या भितीपोटी मोमेंटस हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे.
    त्याला कारण सुद्धा तसेच आहे फेसबुक ने त्यांच्या युझर्स ला फोटो डिलीट करण्याची ताकीद दिली आहे. फेसबुक ने तसे इमेल त्यांच्या युझर्स ला पाठविले आहे. मात्र याविषयी सध्या फार गैरसमज पसरले आहेत. फेसबुक ने युझर्स ला पाठविलेले इमेल मध्ये सर्व फोटो डिलीट करणार असे म्हटलेले नाही तर फ़क़्त सिंक केलेले फोटोच डिलीट करणार असे म्हटलेले आहे. त्यामुळे तुमचे सर्व फेसबुक फोटो डिलीट होणार हे खरे नाही.
    सिंक केलेले फोटो म्हणजे नेमके काय ?
    फेसबुक ने २०१२ मध्ये मोबाइल अ‍ॅप युझर्स साठी फोटो सिंक ही सुविधा सुरु केली होती .त्यामध्ये युझर्स ने त्यांच्या मोबाइल मधून काढलेले फोटो डायरेक्ट फेसबुक अकाउंट मध्ये अपलोड होण्याची ही सुविधा होती . त्यासाठी फेसबुक अ‍ॅप मध्ये सेटिंग मध्ये जाऊन सिंक फोटो ही सुविधा चालू करावी लागे. त्यानंतर तुमच्या मोबाईल द्वारे काढलेले फोटो फेसबुक अकाउंट ला आपोआप अपलोड होत अशी ही सुविधा होती . हे अपलोड झालेले फोटो फ़क़्त तुम्हीच पाहू शकत होता . नंतर फेसबुक वर जाउन कुठले फोटो मित्रांसोबत शेअर करायचे हे तुम्ही ठरवु शकत होता. हे मोबाइल वरून आपोआप अपलोड झालेले फोटो म्हणजे सिंक फोटो .मात्र यावर्षी जानेवारी पासून फेसबुक ने ही फोटो सिंकची सुविधा काढून घेतली आणि त्याएवजी मोमेंटस हे अ‍ॅप युझर्स च्या सेवेत आणले . तुम्ही मोमेंटस हे अ‍ॅप सात जुलै पर्यंत डाउनलोड केले नाही तर केवळ हे सिंक फोटोच डिलीट करण्याची ताकीद फेसबुक ने आपल्या युझर्स ला दिली आहे .जर तुम्हाला मोमेंटस हे अ‍ॅप वापरायचे नसेल तर तुम्ही सात जुलै पूर्वी तुमचे सिंक फोटो तुमच्या संगणकावर डाउनलोड करू शकता आणि जर तुम्ही फेसबुक ची फोटो सिंक ही सुविधाच ऑन केली नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाही कारण तुम्ही अपलोड केलेले इतर सर्व फोटो फेसबुक वर जसेच्या तसे राहणार आहे.
  • anil.bhapkar@lokmat.com 

 

फेसबुक मेसेंजर मध्ये आता इन्स्टंट व्हिडिओ फिचर

  •                                                         अनिल भापकर

    ऑनलाइन लोकमत, दि. २ - दिवसेंदिवस सोशल मीडिया साईटस आपापल्या युझर्सना आकर्षक सेवा देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करीत आहे. काहीही करुन आपले युझर आपल्याला सोडून दुसऱ्या सोशल साईट वर शिफ्ट नाही झाला पाहिजे यावर या कंपन्याचा कटाक्ष असतो.या स्पर्धेत युझर्सना काही तरी नविन द्यावे यासाठी सर्वच सोशल मीडिया प्रयत्न करत असतात.याच स्पर्धेचा भाग म्हणून आता फेसबुक मेसेंजरने त्यांच्या युझर्स साठी इन्स्टंट व्हिडिओ फिचर उपलब्ध करून दिले आहे.
    काय आहे इन्स्टंट व्हिडिओ फिचर ?
    समजा तुमच्या घरात तुमचं लहान बाळ आहे. त्या बाळाच्या बाललीला दररोज तुम्ही बघत आहात.एके दिवशी तुमचं बाळ पहिल्यांदा उभ राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा क्षण तुम्ही तुमच्या मोबाईल कॅमेरा मध्ये रेकॉर्ड केला .हा आनंद तुम्हाला तुमच्या जोडीदारा सोबत शेअर करायचा आहे . त्यावेळी तुम्ही काय कराल ? एकतर तुमच्या जोडीदाराला व्हिडिओ कॉल करून हे आनंददायी क्षण लाईव्ह दाखवाल किंवा तुमचा जोडीदार घरी आल्यावर त्याला हे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवाल . मात्र आता आणखी एक सोपा पर्याय फेसबुक मेसेंजर ने तुम्हाला उपलब्ध करून दिला तो म्हणजे इन्स्टंट व्हिडिओ. यामध्ये फेसबुक मेसेंजर वर चॅट करत असताना असे छोटे छोटे क्षण रेकॉर्ड करून त्याचा व्हिडिओ पाठविता येणार आहे. म्हणजे यापुढे असा एखादा क्षण जो तुम्हाला इतरांसोबत शेअर करावा असे वाटते तो फेसबुक मेसेंजरच्या इन्स्टंट व्हिडिओ या फिचर चा वापर करून आपल्या परिजनांना पाठविता येऊ शकतो.
    इन्स्टंट व्हिडिओ कसे पाठवाल ?
    इन्स्टंट व्हिडिओ हे फिचर वापरायचे असेल तर ज्याला इन्स्टंट व्हिडिओ पाठवायचा आहे त्याच्या स्मार्टफोनवर सुद्धा लेटेस्ट फेसबुक मेसेंजर ओपन असले पाहिजे तरच इन्स्टंट व्हिडिओ तुम्ही समोरच्याला पाठवू शकाल . इन्स्टंट व्हिडिओ हे फिचर व्हिडिओ कॉलिंग पेक्षा पूर्णतः वेगळे आहे.व्हिडिओ कॉलिंगचे फिचर २०१५ पासूनच फेसबुक मेसेंजर मध्ये उपलब्ध आहे.काही वेळा आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचविन्यासाठी शब्द अपुरे पडतात अशा वेळी इन्स्टंट व्हिडिओ हे फिचर कामी येईल.
    anil.bhapkar@lokmat.com

 

                                           वेअरेबल्स


- अनिल भापकर

माणसाचे श्रम कमी करणे आणि उत्पादन वाढवणे यासाठी मानवाने तंत्रज्ञानाचा शोध लावला. मात्र जसाजसा काळ पुढे जाऊ लागला तसतशी तंत्रज्ञानाची व्याख्या बदलू लागली. तंत्रज्ञानाचा आवाका एवढा वाढला कि त्याने मानवाचे जीवनच बदलून टाकले . जणू मानवी जीवनावर तंत्रज्ञान राज्य करू लागले . श्रम कमी करणे आणि उत्पादन वाढवणे यासाठीच सुरु झालेला हा तंत्रज्ञानाचा प्रवास करमणूक ,खेळ ,आरोग्य ,इंटरनेट ,स्मार्टफोन आदींपर्यंत कधी येऊन पोहोचला हे कळले देखील नाही. स्मार्टफोनने तर तंत्रज्ञानाची व्याख्याच बदलून टाकली. आता स्मार्टफोन च्या ही पुढे जाऊन एक तंत्रज्ञान तुम्हाला खुणावते आहे त्याचे नाव आहे वेअरेबल टेक्नोलॉजी. म्हणजे अंगावर परिधान करण्याचे तंत्रज्ञान.येणारा काळ हा या वेअरेबल टेक्नोलॉजीचा असेल, असे म्हणता म्हणता अनेकांच्या अंगावर हे ना ते दिसूही लागले आहे. स्मार्टवॉच पासून सुरु झालेला हा प्रवास थक्क करणारा आहे. करमणूक ,खेळ ,आरोग्य आदी सर्वच क्षेत्रात वेअरेबल टेक्नोलॉजीचा शिरकाव झालेला आहे. त्यापैकी आज आपण आरोग्याशी संबंधित विअरेबल टेक्नोलॉजी विषयी जाणून घेऊ.

वेअरेबल टेक्नोलॉजी 

वेअरेबल टेक्नोलॉजी हे नावच बरेच काही सांगून जाते. म्हणजे अशी टेक्नोलॉजी ज्या पासून तयार झालेली डिव्हाइसेस तुम्ही अंगावर परिधान करू शकता . जसे की स्मार्टवॉच,फिटनेस ट्रॅकर ,
स्पोर्ट्स वॉचेस ,हेड माउंटेड डिसप्ले,स्मार्ट क्लोथिंग ,स्मार्ट ज्वेलरी आणि या सर्वांच्या पुढे म्हणजे इम्प्लांटेबल्स अर्थात तुमच्या शरीरात सर्जरी करून बसविलेली डिव्हाइस.म्हणजे हे विेअरेबल डिव्हाइसेस तुम्ही सहज सोबत घेऊन वावरू शकता. त्याचे अजिबात ओझे तुम्हाला जाणवणार नाही . एवढेच काय तर तुम्ही सोबत विेअरेबल डिव्हाइसेस घेऊन फिरता आहात हे समोरच्याला कळणार देखील नाही.

वेअरेबल टेक्नोलॉजी आणि हेल्थकेअर

दिवसेंदिवस आरोग्याविषयी जागरूकता प्रचंड वाढली आहे. विशेषत: तरु णांना आरोग्याविषयी फार जागरूकता आलेली आहे. म्हणजे दररोज जिम ला जाणे ,फिरायला जाणे. आज अमुक इतका व्यायाम केला, इतके किलोमीटर फिरलो आदी चर्चा सहज ऐकायला मिळतात. सुरु वातीला स्मार्टफोन वर काही ऐप्स आले जे तुम्हाला तुम्ही किती अंतर फिरले तुमच्या अंदाजे किती कॅलरी बर्न झाल्या असतील अशी माहिती द्यायचे. आजही यााची तरु णांमध्ये प्रचंड क्र ेझ आहे. मात्र वेअरेबल टेक्नोलॉजी मध्ये जे डिव्हाइसेस आहे हे कितीतरी अधिक आणि अचूक माहिती तुम्हाला देतात.जसे कि तुम्ही किती अंतर चाललात ,किती कॅलरी बर्न झाल्या, हार्टरेट काय होता...याहूनही अधिक माहिती तुम्हाला देतात.त्याचप्रमाणे तुम्ही किती झोपलात याचा पूर्ण ट्रॅक ठेवतात तसेच तुम्हाला वेळोवेळी अलर्ट देखील करतात.

कसे काम करतात ?

वेअरेबल टेक्नोलॉजी डिव्हाइसेस तुमची हालचाल टिपण्या साठी जीपीएस तंत्रज्ञान वापरतात तसेच ब्लु टूथ वापरून तुमच्या स्मार्टफोन ला कनेक्ट होतात. तसेच या वेअरेबल डिव्हाइसेस मध्ये गरजेनुसार वेगवेगळे सेन्सर लावलेले असतात जे सतत तुमच्या हालचालीवर लक्ष ठेवतात. आणि इंटरनेट तसेच ब्लु टूथ च्या माध्यमातून सर्व डेटा तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉप ला पुरवतात . हे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप एका विशिष्ट प्रोग्राम च्या मदतीने तुमच्या सर्व डेटा चे रेकॉर्ड ठेवते तसेच त्याचे ऐनालिसिस देखील करतात . त्यामुळे तुम्ही दिवसभरात किती चाललात ,किती कॅलरी बर्न केली, त्यावेळी तुमचा हार्टरेट किती होता या सर्व बाबी तुम्हाला कळतात. हे झाले निरोगी आणि व्यायाम करणार्या माणसासाठी पण असे काही विेअरेबल टेक्नोलॉजी डिव्हाइसेस आहे जे काही विशिष्ट आजारावर देखील लक्ष ठेऊन त्याचा डेटा कलेक्ट करून रेकॉर्ड ठेवतात ज्याचा वापर डॉक्टर पेशंट ची हिस्ट्री ठेवण्यासाठी करतात आणि त्यानुसार पेशंटवर उपचार करतात.
anil.bhapkar@lokmat.com