सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

स्मार्टफोन नव्हे तुमचा गुगल पासवर्ड

                                                                                      अनिल भापकर
सध्याच्या पिढीला प्रायव्हसीने एवढे पछाडले आहे कि अगदी नवरा-बायको सुद्धा एकमेकांचे पासवर्ड एकमेकांना शेअर करत नाही . प्रत्येकजण आपापल्या परीने आपले युजरनेम आणि पासवर्ड गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतो . बर युझर नेम पासवर्ड ही किती असावे याला ही काही मयार्दा असाव्या , काम्पुटर चा युझर नेम पासवर्ड , स्मार्टफोन चा युझर नेम पासवर्ड , इमेल चा युझर नेम पासवर्ड, बँकेचा युझर नेम पासवर्ड , क्रेडीट कार्ड चा युझर नेम पासवर्ड ,मात्र यात नेमका घोळ होतो आणि कोणता पासवर्ड कशाचा आहे हेच विसरते. म्हणजे पासवर्ड ही एक सुरक्षा नसून कटकट आहे असे वाटायला लागते.
आता या पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या कटकटीतून गुगलने तुमची सुटका केली आहे. मात्र त्यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा आयफोन ५ एस किंवा त्याहून लेटेस्ट आयफोन असावा .अँड्रॉइड स्मार्टफोन यूझर्सला जर ही सुविधा स्मार्टफोन वर सुरू करायची असल्यास डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वर गुगल चालू केल्यावर गुगल अ‍ॅप्स मध्ये जाऊन माय अकाउंट ला क्लिक करावे त्यानंतर साइन इन अँड सिक्युरिटी वर क्लिक करून पुढील प्रोसेस पूर्ण करावी . यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये सुद्धा काही बदल करावे लागतील . जसे की सेटिंग मध्ये जाऊन सिक्युरिटी मध्ये जावे लागेल .
या ठिकाणी जाऊन स्क्रीन लॉक हे आॅप्शन सिलेक्ट करावे लागेल . त्यामध्ये जर नन असेल तर त्या ऐवजी पिन किंवा पॅटर्न लॉक किंवा इतर स्क्रीन लॉक आॅप्शन पैकी (स्लाईड सोडून ) सिलेक्ट करावे लागेल . एकदा का ही प्रोसेस पूर्ण झाली की जेव्हा तुम्ही कुठल्याही डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वर गुगल (जीमेल किंवा इतर गुगल लॉगिन ) लॉगिन कराल तेव्हा युझर नेम दिल्या नंतर पासवर्ड म्हणून तुमचा स्मार्टफोन अनलॉक करावा लागेल . तुमचा स्मार्टफोन अनलॉक केला की तुम्ही गुगल (जीमेल आदी ) ला लॉगिन व्हाल . झाली की नाही पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या कटकटीतून सुटका .
anil.bhapkar@lokmat.com

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा