शुक्रवार, १० जून, २०१६

ट्विटर : पासवर्ड रिसेट करा

अनिल भापकर
औरंगाबाद, दि. १० - जवळपास तीन कोटी ट्विटर अकाऊन्टचे पासवर्ड हॅक झाल्याची मोठी खळबळजनक घटना काल घडली होती. ३,२८,८८,३०० ट्विटर लॉगिन पासवर्ड हॅक झाल्याचा दावा' लिकडसोर्स  या वेब साईटने काल केला होता. यामध्ये हॅकरकडे पासवर्ड हे प्लेन टेक्स्ट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटले होते. मात्र दुसरीकडे ट्विटर ने असा दावा केला होता  कि आमच्या सिस्टम मधून कुठलेही लॉगिन पासवर्ड हॅक झालेली नाही. आज मात्र ट्विटर ने त्यांच्या ऑफिशिअल ब्लॉग वर जाहीर केले कि ज्या युझर्स चे ट्विटर अकाउंट हॅक झाले असण्याची शक्यता आहे, अशा सर्व युझर्सचे ट्विटर अकाउंट लॉक करण्याचा निर्णय ट्विटरने घेतला आहे.
ज्या ट्विटर युझर्स चे अकाउंट लॉक करण्यात आले आहे अशा सर्व युझर्सला ट्विटरने नोटिफ़िकेशन्स पाठवून त्यांचे पासवर्ड रिसेट करण्यास सांगितले आहे. जोपर्यंत पासवर्ड रिसेट होत नाही तोपर्यंत ट्विटर युझर्स चे अकाउंट लॉक राहील असे ट्विटर ने आपल्या ब्लॉग वर सांगितले आहे. सोबतच ट्विटर ने आपल्या युझर्स ला आपल्या ट्विटर अकाउंटच्या सुरक्षेसाठी काही टिप्स देखील या ब्लॉग वर दिल्या आहेत त्या खालील प्रमाणे आहेत :
 
ट्विटरने दिलेल्या सिक्युरिटी टिप्स :
१. लॉगीन व्हेरीफिकेशंस इनबल करा .
२. पासवर्ड शक्यतो जेवढा अवघड ठेवता येईल तेवढे चांगले,तसेच ट्विटर अकाउंटला दिलेला पासवर्ड दुसऱ्या वेबसाईट ला वापरू नका.
३. शक्यतो अगोदर दिलेला पासवर्ड पुन्हा रिपिट करू नये.
४. १पासवर्ड आणि लास्टपास यासारखे पासवर्ड मनेजर वापरण्याचा सल्ला देखील ट्विटर ने आपल्या युझर्स ला दिला आहे. ज्यामुळे ट्विटर युझर्स ला अवघड आणि युनिक पासवर्ड ठेवण्यास या पासवर्ड मनेजर ची मदत होईल 
anil.bhapkar@lokmat.com.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा