मंगळवार, ७ जून, २०१६

झुकरबर्गचे ट्विटर अकाऊन्ट हॅक झाले तुमचं काय ?

अनिल भापकर
औरंगाबाद, दि. ७ - सध्या जगभरातील चर्चेचा विषय म्हणजे जर फेसबुक चा संस्थापक मार्क झुकरबर्ग चे ट्विटर अकाऊन्ट हॅक होऊ शकते तर आपले काय ? सोशल मेडिया मधील येवढा मोठा बाप माणूस ज्याने सोशल मेडिया कशाला म्हणतात हे अख्या जगाला शिकवले त्यावर ही वेळ यावी . म्हणजे सोशल मेडिया च्या सुरक्षे साठी काय करायला पाहिजे हे सगळ्या जगाला सांगणाऱ्या वर त्याचे ट्विटर अकाऊन्ट हॅक झाले हे सांगण्याची वेळ यावी. असो आपण मात्र आपले सोशल मिडिया अकाऊन्ट कसे सुरक्षित करता येईल हे बघण्याचा पुसटसा प्रयत्न करु.
सोशल मेडिया अकाऊन्ट जसे कि फेसबुक , ट्विटर , लिंकडन आदी अकाऊन्टच्या सुरक्षेसाठी काय केले पाहिजे हे पाहू....
१. तुमच्या' सोशल मेडिया अकाऊन्ट वर अनोळखी माणसाचा मेसेज शक्यतो ओपन करू नका . जर मेसेज फारच महत्वाचा असेल तर शक्य झाल्यास ज्याचा मेसेज आहे त्याला इतर मार्गाने संपर्क करून कन्फर्म करा जसे कि इमेल करून वगैरे .
२.एखाद्याला ट्विटर वर फॉलो करताना किंवा फेसबुक वर मैत्रीचा स्विकार करताना अकाऊन्ट फेक तर नाही ना याची खात्री करा.
३. फ्री ऑफर असणारी लिंक असल्यास त्यावर शक्यतो क्लिक करू नका .
४. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा पासवर्ड नियमीत बदलत राहावे आणि शक्यतो अगोदर दिलेला पासवर्ड पुन्हा रिपिट करू नये. तसेच तुमचे नाव किंवा तुमच्या परिजनाचे नाव पासवर्ड मध्ये वापरू नये ज्यामुळे हॅकरला पासवर्ड चा अंदाज लावायला सोपे होईल . पासवर्ड शक्यतो जेवढा अवघड ठेवता येईल तेवढे चांगले .
५. तुमच्या सोशल मेडिया वर जर काही अनपेक्षित घडत असेल याचाच अर्थ तुमचे अकाऊन्ट हॅक झाले तेव्हा लगेच तुमचा पासवर्ड बदला .
६. सोशल मेडिया वर वावरताना प्रत्येक सोशल साईट चा पासवर्ड वेगवेगळा ठेवा जसे कि ट्विटर चा पासवर्ड वेगळा फेसबुक चा पासवर्ड वेगळा असे.
anil.bhapkar@lokmat.com

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा