सोमवार, २० जून, २०१६

…. अखेर विंडोज -१० ला फेसबुक अॅप मिळाले

अनिल भापकर 
औरंगाबाद, दि. २० - टेक्नो जगतातील दोन दादा कंपन्या एक म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि दुसरी म्हणजे फेसबुक. मायक्रोसॉफ्ट ही ऑपरेटिंग सिस्टम मधील दादा कंपनी तर फेसबुक ही सोशल मेडिया मधील दादा कंपनी. मात्र असे असूनही मायक्रोसॉफ्टच्या विंडोज -१० ह्या ऑपरेटिंग सिस्टमला अजून पर्यंत फेसबुक अॅप ऑफिशियली उपलब्ध झालेले नव्हते. मात्र आता विंडोज -१० मोबाइल आणि पीसी धारकांसाठी गुड न्यूज आहे, फेसबुक ने विंडोज -१० साठी ऑफिशियल फेसबुक अॅप उपलब्ध केले आहे.
आतापर्यंत विंडोज -१० युझर्स साठी जे फेसबुक अॅप उपलब्ध होते ते मायक्रोसॉफ्टने डेव्हलप केलेले होते . मात्र आता फेसबुक ने जगभरातील विंडोज -१० युझर्स वर लक्ष केंद्रित करत त्यांच्या साठी फेसबुक अॅप उपलब्ध केले आहे. सध्या हे फेसबुक अॅप चे बीटा व्हर्जन मध्ये उपलब्ध असले तरी लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होईल असे विंडोज सेन्ट्रल डॉट कॉम या साईट ने म्हटले आहे. 
anil.bhapkar@lokmat.com

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा